Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्याची वाडी (कावनई) या आपल्या शाळेची Z24 तास या वृत्तवाहिनीने दाखवलेली बातमी

कावनई किल्ल्याविषयी माहिती

Image
वेशीवरच्या पाऊलखुणा : कावनई ह्युएनत्संगच्या कावनई गावात! एखाद्या गावाला पौराणिक , धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल , तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. शिवशंकर , पार्वती , कपिलमुनी , श्रीराम , हनुमान , शुक्राचार्य , छत्रपती शिवाजी महाराज , समर्थ रामदास , गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. कधीकाळी संख्याशास्त्र अभ्यासासाठी जगभरात विद्यार्थी कावनईच्या गुरुकुलात येत. आता या गुरुकुलाचे अस्तित्व फक्त ह्युएनत्संगने कपिलधारा तीर्थावर भेट दिलेल्या एका अनोख्या घंटेमुळे आठवणींच्या नादांपुरते जाणवते. कावनईची पौराणिक व धार्मिक ओळख अजूनही टिकून आहे , पण गरज आहे ती ह्युएनत्संगने भेट दिलेल्या गावाला संख्याशास्त्र अभ्यासाचे गुरूकुल म्हणून नवी ओळख करून देण्याची. नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. १८६१पा